वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेत तिसरा मोठा उलटफेर झाला आहे. अफगाणिस्तानने इंग्लंडनंतर पाकिस्तानला पराभवाचं पाणी पाजलं आहे. यापूर्वी नेदरलँडने दक्षिण आफ्रिकेला पराभूत केलं होतं. त्यामुळे दुबळ्या समजल्या जाणाऱ्या संघांनी दिग्गज संघांना पराभूत केल्याने क्रीडा जगतात जोरदार चर्चा रंगली आहे. आयसीसी स्पर्धेत अफगाणिस्तानने दोन दिग्गज संघांना पराभूत करण्याची ही पहिलीच वेळ आहे. पाकिस्तानने नाणेफेकीचा कौल जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. 50 षटकात 7 गडी गमवून 282 धावा केल्या आणि विजयासाठी 283 धावांचं आव्हान दिलं. हे आव्हान अफगाणिस्तानने 8 गडी आणि 6 चेंडू राखून पूर्ण केलं. यासह पाकिस्तानची उपांत्य फेरीची वाट आणखी बिकट झाली आहे. पाकिस्तानने स्पर्धेत पहिले दोन सामने जिंकत आव्हान कायम ठेवलं होतं. पण त्यानंतर सलग तीन सामन्यात पराभवाचं तोंड पाहावं लागलं आहे.
विश्वचषक स्पर्धेत अफगाणिस्तानने पाकिस्तानला हरवले….8 गडी राखून विजय..
- Advertisement -