आयसीसी वनडे वर्ल्डकपमध्ये इंग्लंडविरुद्ध प्रथम फलंदाजी करताना भारताने ९ बाद २२९ धावा केल्या होत्या. विजयासाठी २३० धावांचे लक्ष्य घेऊन मैदानात उतललेल्या इंग्लंडची भारताचा आघाडीचा गोलंदाज जसप्रीत बुमराहने अशी काही दाणादाण उडवली ज्यातून ते सावरू शकले नाहीत.
इंग्लंडच्या डावाची सुरुवात जॉनी बेयरस्टो आणि डेव्हिड मलान यांनी केली. या दोघांनी पहिल्या ४ षटकात २६ धावा केल्या होत्या. भारताकडून जसप्रीत बुमराह पाचवी ओव्हर टाकण्यासाठी आला.
या ओव्हरच्या पहिल्या ४ चेंडूवर बुमराहने एक चौकार दिला होता. पण पाचव्या चेंडूवर बुमराहने इंग्लंडला पहिला धक्का दिला.
बुमराहने डेव्हिड मलानची बोल्ड घेतली. बुमराहने टाकलेला आगीचा गोळा मलानला कळालाच नाही. चेंडूने बॅटचा स्पर्श केला आणि विकेटला लागला. या पहिल्या धक्क्यातून इंग्लंड सावरण्याआधी बुमराहने ओव्हरच्या अखेरच्या चेंडूवर जो रूटला LBW बाद केले.