अफगाणिस्तानने १३व्या विश्वचषकात अनपेक्षितपणे इंग्लंडवर विजय मिळवत क्रिकेट विश्वात सर्वांनाच धक्का दिला. त्यांनी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर गतविजेत्या इंग्लंडचा पराभव करून मोठा विजय संपादन केला. अफगाणिस्तान संघाने हा सामना ६९ धावांनी जिंकला. २०१५च्या विश्वचषकानंतर स्पर्धेतील त्यांचा हा पहिलाच विजय आहे.
इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. अफगाणिस्तानचा संघ ४९.५ षटकांत सर्वबाद २८४ धावांवर आटोपला. इंग्लंडसमोर विजयासाठी २८५ धावांचे लक्ष्य होते, परंतु त्यांचा संपूर्ण संघ ४०.३ षटकांत २१५ धावांत सर्वबाद झाला