नगर शहर काँग्रेस ब्लॉक कमिटीचे अध्यक्ष मनोज सुवालाल गुंदेचा यांच्या विरोधात समाज माध्यमातून गुजराती समाजाच्या भावना दुखावल्याप्रकरणी नगर शहरातील समस्त गुजराती समाजाच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षक तसेच कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी गुजराती समाजाने मनोज गुंदेच्या यांच्यावर कठोर अशी कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी केली आहे. पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुजराती समाज मोठ्या संख्येने एकत्रित आलेला होता.
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया विश्व करंडकाच्या अंतिम सामन्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स याला विश्वविजेते पदाची ट्रॉफी प्रदान केली. यावेळेस झालेला घटनेचा फोटो फेसबुक समाज माध्यमात पोस्ट करत मनोज गुंदेच्या यांनी केलेल्या कमेंटवर गुजराती समाजाने आक्षेप घेतला आहे. या विरोधात गुंदेचा यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी केली आहे.