भारतीय संघ हा वर्ल्डकप २०२३ स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी सज्ज झाला आहे. हा सामना १९ नोव्हेंबर रोजी भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये रंगणार आहे. आयसीसी वनडे वर्ल्डकप स्पर्धेच्या अंतिम सामन्याची सर्वांनाच प्रतिक्षा आहे. भारतीय संघातील खेळाडू सध्या तुफान फॉर्ममध्ये आहेत. अशातच काही तरुणांनी भारतीय संघाच्या विजयासाठी खास गाणं तयार केलं आहे. या गाण्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होत आहे
भारताच्या उपांत्यफेरीच्या दिवशीही एकत्र जमलेल्या क्रिक्रेट प्रेमींनी टीव्हीवर एकत्रित सामना पाहण्याचा आनंद घेतला. तसंच रविवारचा अंतिम सामना पाहण्यासाठी काही ठिकाणी लाइव्ह स्क्रिनिंग केलं जाणार आहे. काही मुंबईकरांनी जवळच्या रिसॉटवर तसंच स्पोर्टस् बार, पब, मॉलमध्ये जाऊन अंतिम सामना पाहण्याची योजना आखली आहे.
Cricket Song: वर्ल्डकप फायनलसाठी तरुणांनी तयार केलं स्पेशल गाणं.. व्हिडीओ
- Advertisement -