‘युनेस्को’ च्या २०२४-२५ च्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये महाराष्ट्रातील ११ किल्ल्यांच्या नामांकनाचा प्रस्ताव केंद्र सरकारने पाठविला आहे, याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ संभाजी शिंदे यांनी आनंद व्यक्त केला असून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारच्या संस्कृती मंत्रालयाचे आभार मानले आहेत.
या किल्ल्यांना शौर्य, पराक्रम आणि रयतेच्या कल्याणाचा वारसा, ऐतिहासिक महत्त्व आहे. महाराष्ट्रातील साल्हेर, शिवनेरी, लोहगड, खांदेरी, रायगड, राजगड, प्रतापगड, सुवर्णदुर्ग, पन्हाळा, विजयदुर्ग, सिंधुदुर्ग या ११ किल्ल्यांचा प्रस्ताव युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादी (World Heritage List) मध्ये नामांकनासाठी पाठविण्यात आला असून यावर अंतिम मोहोरही उमटेल, असा विश्वास मुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केला आहे.
UNESCO