व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, कुस्तीचा सामना सुरु आहे. बुध्दीच्या जोरावर प्रतिपक्षावर मात करण्याचे डावपेच असलेला हा प्रकार असून दोन्ही पैलवान एकमेकांना हरवण्यासाठी आखाड्यात उतरले. यावेळी सामना सुरु असून पुढे काय होईल याची कुणालाही कल्पना नव्हती. कारण एका पैलवानानं दुसऱ्या पैलवानाला अक्षरश: उलटं, पालटं करुन हरवण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याला विरोध करण्याएवजी समोरचा पैलवान इतका घबरला की तो आखाडा सोडून पळून लागला. यावेळी कुस्ती पाहण्यासाठी फडावर जमलेली मंडळी त्याला पुन्हा आखाड्यात ढकलण्याचा प्रयत्न करत होते. शेवटी पंच येतात आणि दोघांनाही समोर उभं करुन निकाल जाहीर करतात. अर्थातच आखाडा सोडन पळून गेलेला पैलवानाचा पराभव होतो.
पैलवानाने टाकले असे डावपेच की समोरचा पैलवान मैदान सोडून पळाला..व्हिडिओ
- Advertisement -