बहुतांश लोक हे त्यांच्या डाव्या हातात घड्याळ घालतात. यासंबंधीत Quora वर प्रश्न विचारला गेला की लोक हे डाव्या हातातच घड्याळ का घालतात? खरंतर बहुतांश लोक हे उजव्या हाताने काम करतात. अशावेळी त्यांचा उजवा हात हा जास्तीत जास्त वेळ व्यस्त असतो. अशावेळी मोकळा असलेल्या डाव्या हातात तुम्ही वेळ पाहू शकता. त्यामुळे लोक त्यांच्या डाव्या हातात घड्याळ घालतात.
जुन्या काळात, बरेच लोक त्यांची घड्याळे त्यांच्या मनगटावर ठेवण्याऐवजी त्यांच्या खिशात ठेवत असत. परंतू आता लोक ती घड्याळं हातात घालतात.घड्याळ्याच्या वेळेची सुरुवात ही 12 पासून होते. म्हणजे सकाळची वेळ आणि रात्रीची वेळ ही 12 नंतर सुरु होते. त्यामुळे संख्यांचं वाचन 12 च्या पुढे उजवीकडून होते. त्यामुळे जर तुम्ही घड्याळ तुमच्या डाव्या हाताच्या ऐवजी तुमच्या उजव्या हाताला घातलं तर 12 चा आकडा खाली जाईल आणि क्रम उलटेल. अशा परिस्थितीत तुम्हाला रीडिंग घेण्यात अडचण येईल. जोपर्यंत स्वयंचलित घड्याळे प्रचलित होती, तोपर्यंत बरेच लोक ते दोन्ही हातांवर घालायचे.
उजव्या हातात घड्याळ बांधल्यावर चावी आतल्या बाजूला राहते, त्यामुळे चावी भरण्यात अडचण येत होती, कारण उजव्या हातात बांधल्यावर ती आतील बाजूस वळते. ज्यामुळे लोक ते डाव्या हातात घालू लागले.