Sunday, July 14, 2024

Yamaha च्या दुचाकींवर फेस्टिवल ऑफर, कॅशबॅकसह अल्प डाऊनपेमेंट…

Yamaha Motor India…
गणेशोत्सव अधिक उत्साहात साजरा करण्‍यासाठी यामाहा मोटार इंडियाने विशेष ऑफर्स आणल्या आहेत. या अंतर्गत तुम्हाला विशेष कॅशबॅक आणि फायनान्‍स ऑफर्स मिळणार आहेत. या ऑफर्समुळे तुम्हाला स्वस्तात दुचाकी विकत घेण्याची संधी आहे. यामाहाच्या विशेष ऑफर्स 30 सप्‍टेंबर 2023 पर्यंत वैध असणार आहेत.

विशेष कॅशबॅक आणि फायनान्‍स ऑफर्स सध्‍या मुंबईमध्‍ये यामाहाच्या 150 सीसी एफझेड मॉडेल रेंज आणि यामाहा रे झेडआर 125 सीसी फाय हायब्रिड स्‍कूटरवर उपलब्‍ध आहे.

तर उर्वरित महाराष्‍ट्रामध्‍ये यामाहाची 150 सीसी एफझेड मॉडेल आणि फॅसिनो 125 सीसी हायब्रिड स्‍कूटरवर उपलब्‍ध आहे.

वर उल्लेख केलेल्या नवीन दुचाकींच्या खरेदीवर फ्लॅट 3,000 रुपये कॅशबॅक दिला जात आहे. सोबतच, या गाड्यांच्या डाऊन पेमेंटवर (सुरुवातीला भरावयाची रक्कम) देखील मोठा डिस्काउंट दिला जात आहे. कमी डाऊन पेमेंट करुन तुम्ही दुचाकी खरेदी करू शकता. सुरुवातीला केवळ 7,999 रुपये भरुन तुम्ही या गाड्या बुक करू शकता.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles