Thursday, July 25, 2024

नगर महानगरपालिकाआयुक्त तथा प्रशासक पदाचा पदभार यशवंत डांगे यांनी स्वीकारला

अहमदनगर महानगरपालिकाआयुक्त तथा प्रशासक पदाचा पदभार यशवंत डांगे यांनी स्वीकारला

नगरकरांमध्ये महापालिकेबद्दल आपलेपणाची भावना वृद्धिंगत करण्यासाठी प्रयत्न केले जाईल – यशवंत डांगे

नगर : अहमदनगर महानगरपालिकेच्या आयुक्त तथा प्रशासक पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर अधिकारी व प्रभाग अधिकारी यांची संयुक्त बैठक घेतली असून सुरू असलेल्या विकास कामांना गती देण्याच्या सूचना यावेळी दिल्या आहेत. मनपा प्रशासनाला गतिमान करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला जाईल, याचबरोबर नगरकरांमध्ये महापालिकेबद्दल आपलेपणाची भावना वृद्धिंगत करण्यासाठी प्रयत्न केले जाईल, याचबरोबर दैनंदिन प्रश्न प्राधान्यक्रमाने सोडवले जातील, स्वच्छ, सुंदर हरित नगर शहर बनविण्यासाठी काम केले जाईल असे मत अहमदनगर मनपा आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी केले
अहमदनगर महानगरपालिकाआयुक्त तथा प्रशासक पदाचा पदभार यशवंत डांगे यांनी स्वीकारला यावेळी अतिरिक्त आयुक्त सौरभ जोशी, उपायुक्त विजयकुमार मुंढे,सहायक आयुक्त सपना वसावा, आस्थापना विभाग प्रमुख मेहेर लहारे,मुख्य लेखापरीक्षक विशाल पवार,जल अभियंता परिमल निकम,आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोरगे, शहर अभियंता मनोज पारखे, प्रसिद्धी अधिकारी शशिकांत नजान,अग्निशमन विभाग प्रमुख शंकर मिसाळ, अभियंता गणेश गाडळकर, प्रभाग अधिकारी अशोक साबळे आदी उपस्थित होते.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles