Tuesday, May 13, 2025

Video क्रिकेटच्या इतिहासात पहिल्याच चेंडूवर १३ धावा… जगातील पहिला खेळाडू ‘यशस्वी’

ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या इतिहासात पहिल्याच चेंडूवर १३ धावा करणारा यशस्वी हा जगातील पहिला खेळाडू ठरला. त्याने झिम्बाब्वेचा कर्णधार सिकंदर रझाच्या पहिल्या षटकातील पहिल्याच चेंडूवर षटकार ठोकला. हा नो-बॉल असल्याने जैस्वालला फ्री हिटच्या रूपात आयती संधी मिळाली. मग आणखी एक षटकार मारून यशस्वीने एका चेंडूत १३ धावांची नोंद केली. पण, ज्या सिकंदरविरूद्ध यशस्वीने ऐतिहासिक कामगिरी केली त्याच जैस्वालला बाद करण्यात प्रतिस्पर्धी संघाच्या कर्णधाराला यश आले. तो ५ चेंडूत २ षटकारांच्या मदतीने १२ धावा करून बाद झाला.https://x.com/SonySportsNetwk/status/1812449892515635388

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles