वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर आरक्षण बचाव यात्रेच्या माध्यमातून आक्षणाच्या मुद्द्यावर भाष्य करताना दिसतायत. त्यांनी यवतमाळच्या सभेत बोलताना मोठं भाष्य केलंय. कुणबी मराठा हे खरे ओबीसी नाहीत, असं ते म्हणालेत. ते यवतमाळच्या पुसदमध्ये जाहीर सभेला संबोधित करत होते. “कुणबी मराठ्यांपासून सावध राहा. आताचं जे सभागृह आहे, त्यामध्ये 190 कुणबी समाजाचे आमदार आहेत. फक्त 11 आमदार हे ओबीसी समजाचे आहेत. कुणबी हा स्वत:ला ओबीसी म्हणत असला तरी तो सभागृहात मी मराठ्यांसोबत आहे, असे सांगतो. तो धनगरांसोबत नाही, तो माळ्यांसोबत नाही, तो वंजारी, लिंगायत, बंजारा यांच्यासोबत नाही. तो तेली, तांबोळी, कुणबी, लोहार, सोनार यांच्यासोबत तर अजिबातच नाही,” असे प्रकाश आंबेडकर म्हणाले. म्हणूनच मी सावध राहा असे सांगत आहे. ओबीसीच्या आरक्षणाला धोका आहे. हा धोका 100 टक्के आहे. निवडणुकीनंतर हा धोका निर्माण होईल. माझ्या आधीच्या वक्त्याने सांगितलं की ओबीसींची जातगणना झाली पाहिजे. ही जनगणना झाली पाहिजे,” अशी मागणीही प्रकाश आंबेडकर यांनी केली.
ओबीसी आरक्षणाला 100 टक्के धोका, कुणबी मराठा हे ओबीसी नाहीच…प्रकाश आंबेडकरांचे मोठे वक्तव्य
- Advertisement -