Friday, June 14, 2024

काळाजी घ्या, राज्यात अनेक ठिकाणी उष्णतेचा यलो अलर्ट, हवामान विभागाकडून महत्वाचे अपडेट

मान्सून अंदमान निकोबारमध्ये १९ मे रोजीच पोहचला आहे. महाराष्ट्रात जूनच्या पहिल्या आठवड्यात मान्सून येण्याची शक्यता आहे. मान्सूनच्या प्रगतीकडे सर्वांचे डोळे लागले असताना राज्यात उष्णतेचा यलो अलर्ट जारी केला आहे. विदर्भ, उत्तर महाराष्ट्र आणि कोकणात उष्णतेचा अलर्ट जारी करण्यात आला आहे. २६ मे पर्यंत उष्णतेची लाट कायम राहणार आहे. हवामान खात्याकडून जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिकसह संपूर्ण उत्तर महाराष्ट्रात उष्णतेचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुढचे दोन दिवस नाशिकमध्ये उन्हाची तीव्रता आणखी वाढणार असून नागरिकांनी काळजी घेण्याच आवाहन करण्यात आला आहे.

पुणे हवामान विभागाचे शास्त्रज्ञ के.एस.होसाळीकर यांनी राज्यात उष्णतेचे वारे वाहणार असल्याचे ट्विट केले आहे. २२ मे २६ मे दरम्यान राज्यातील काही भागांत हिट वेव्ह असणार आहे. या काळात नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.
https://x.com/RMC_Mumbai/status/1793184886695534700?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1793184886695534700%7Ctwgr%5E548f0f15ea0c1d899b941fb5dc844aa0c44c2888%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fwww.tv9marathi.com%2Fmaharashtra%2Fimd-heat-wave-in-maharashtra-marathi-news-1203757.html

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles