महाराष्ट्रात नेमकं लोकसभा निवडणुकांचं काय चित्र असेल? याविषयी राजकीय विश्लेषक योगेंद्र यादव यांनी मोठं भाकित केलं आहे.
योगेंद्र यादव यांनी त्यांच्या अधिकृत एक्स (ट्विटर) अकाउंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये देशात भाजपा व एनडीएची यंदाच्या लोकसभा निवडणुकीत पीछेहाट होईल, असं ते म्हणाले आहेत. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाला तब्बल ३०३ जागा मिळाल्या होत्या. त्यामुळे पूर्ण बहुमत भारतीय जनता पक्षाच्या पाठिशी होतं. एनडीएकडे एकूण ३५३ जागा होत्या. यंदा भाजपानं ४०० पारचा नारा दिला आहे. एकीकडे पक्षाकडून या जागा मिळण्याचा विश्वास व्यक्त केला जात असताना दुसरीकडे योगेंद्र यादव यांनी मात्र एनडीएला तब्बल ९० ते १०० जागांचा फटका बसण्याची शक्यता वर्तवली आहे.
राज्यातल्या सध्याच्या राजकीय स्थितीत भाजपाप्रणीत एनडीएला तब्बल २० जागांचा फटका बसू शकतो, असा अंदाज योगेंद्र यादव यांनी वर्तवला आहे. सध्या राज्यातल्या ४८ जागांपैकी ४२ जागा एनडीएकडे असून त्यातल्या त्यांच्या २० जागा कमी होणार आहेत, असं योगेंद्र यादव म्हणाले आहेत.https://x.com/_YogendraYadav/status/1789881175219040686