Wednesday, February 28, 2024

योगी आदित्यनाथ यांना महाराष्ट्राच्या इतिहासाचा अभ्यास कमी.. अजितदादांच्या शिलेदाराची कडाडून टिका

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. पुण्यातील आळंदीत त्यांनी अमृत महोत्सवाला हजेरी लावली आहे. यावेळी योगी आदित्यनाथ यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल विधान केलं आहे. समर्थ रामदास स्वामींनी छत्रपती शिवाजी महाराजांना घडवलं असल्याचं योगी म्हणाले आहेत. त्यावरुन अजित पवार गटाचे अमोल मिटकरी यांनी सडकून टीका केली आहे. योगी आदित्यनाथ यांना महाराष्ट्राच्या इतिहासाचा अभ्यास कमी असून त्यांनी तो करावा, अशी टीका अमोल मिटकरी यांनी केली आहे.
अमोल मिटकरी म्हणाले, योगी आदित्यनाथ यांचे विधान अत्यंत चुकीचे आहे. इतिहासाचा अभ्यासक म्हणून मी हे कधीही स्वीकारू शकत नाही. राजमाता जिजाऊ याच छत्रपती शिवाजी महाराजांच्या मार्गदर्शक गुरू होत्या. योगी आदित्यनाथ उत्तर प्रदेशचे असल्यामुळे त्यांचा महाराष्ट्राच्या इतिहासाचा अभ्यास नसेल, त्यांनी तो करावा. योगी आदित्यनाथ यांनी गोविंददेव गिरी महाराजांबद्दल काय बोलावे, हा त्यांचा अधिकार आहे. पण खरे शिवचरित्र लोकांसमोर आणण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. शिवरायांच्या गुरू फक्त आणि फक्त राजमाता जिजाऊ होत्या आणि आध्यात्मिक गुरू म्हणून संत तुकाराम यांनी कार्य केलं असल्याचं अमोल मिटकरींनी स्पष्ट केलं आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles