सध्या सोशल मीडियाचा जमाना आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकाला सोशल मीडियाचे वेड लागलंय. सोशल मीडियावर लाईक्स अन् व्हिव्यूज मिळवण्यासाठी तरुणाई काहीही करायला तयार असते. सध्या सोशल मीडियावर असाच एक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एका तरुणीने रीलसाठी धोकादायक स्टंट केल्याचे दिसत आहे.सध्या तरुणाईमध्ये सोशल मीडियावर फेमस होण्यासाठी जणू स्पर्धाच लागली आहे. रीलस्टार होण्यासाठी तरुण- तरुणी नवनवे कंटेट शोधत असतात. अनेक जण भररस्त्यात जीवघेणे स्टंट करत, डान्स करत नेटकऱ्यांचे लक्ष वेधत असतात. सध्या सोशल मीडियावर एका तरुणीचा असाच धक्कादायक व्हिडिओ व्हायरल होत आहे.
या व्हिडिओमध्ये एक तरुणी भररस्त्यात हातात बंदूक घेऊन डान्स करताना दिसत आहे. एकीकडे रस्त्यावर वाहनांची वर्दळ, ये- जा सुरू आहे. अशातच ही तरुणी मध्येच उभी राहून डान्स करत आहे. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर नेटकऱ्यांनी त्यावर संतप्त प्रतिक्रिया दिल्यात. अनेकांनी मुलीवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
instagram star सिमरन यादव लखनऊ सरेआम नियम कानून व आचार संहिता की धज्जियाँ उड़ाते हुए highway पर पिस्टल को लहराकर video वायरल करके समाज में अपनी बिरादरी का रौब जमा रहीं हैं परंतु अधिकारी चुप्पी साधे हुए है l @dgpup @ECISVEEP @Splucknow_rural @Igrangelucknow @adgzonelucknow @myogi pic.twitter.com/GN4zWsc1P9
— Advocate kalyanji Chaudhary (@DeewaneHindust1) May 9, 2024