सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. पुण्यातील स्वामी नारायण मंदिराजवळ असलेल्या एका उंच वास्तूवर ही तरुणी स्टंट करताना दिसली. ही तरुणी या उंच वास्तूवरून खाली लटकली आहे, तर वरती असलेल्या एका तरुणाने तिचा हात पकडला आहे. चुकूनही तिचा हात सुटला असता तर मोठी दुर्घटना घडली असती.घटनेचा व्हिडिओ अंगावर काटा आणणारा आहे. या स्टंटचं चित्रीकरण करण्यासाठी कॅमेरामनसुद्धा त्या ठिकाणी उपस्थितीत असल्याचं पाहायला मिळतं. तो वरती थांबला असून तरुणीच्या या भयंकर स्टंटचा व्हिडिओ काढत आहे.https://x.com/punekarnews/status/1803647902327382127
रिल्सच्या नादात तरुणीचा जीवघेणा स्टंट… अंगावर काटा आणणारा व्हिडिओ
- Advertisement -