Thursday, July 25, 2024

Ahmednagar news: रेल्वेखाली उडी घेऊन तरुणाची आत्महत्या, तीन दिवसात दुसरी घटना

अहमदनगर-नुकतीच १७ वर्षीय मुलीने रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना ताजी असतानाच आज सकाळी राहुरी तालुक्यातील टाकळीमिया रेल्वेस्टेशनवर मुसळवाडी येथील आसिफ आयुब पठाण या ३० वर्षीय तरुणाने रेल्वेखाली आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

याबाबत रेल्वेस्टेशन परिसरातील लोकांनी टाकळीमियाचे पोलीस पाटील नामदेव जगधने यांना माहिती दिली. जगधने यांनी याची खबर पोलीस स्टेशनला दिली. पो.हवालदार राहुल यादव यांनी घटनास्थळी दाखल झाले. अधिक माहीती घेतल्यानंतर मयत तरुणाची ओळख पटली.

त्याच्या घरी संपर्क साधला सदर मयताचा भाऊ अनिस आयुब पठाण हा घटनास्थळी आल्यावर त्याच्याकडे विचारणा केल्यानंतर त्याने आजारपणाला कंटाळुन आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त केला. पोलीसांनी सदर घटनेचा पंचनामा करुन मृतदेह शवविच्छेदनासाठी राहुरीच्या ग्रामिण रूग्णालयात पाठवला आहे. पोलीसांनी आकस्मिक मृत्यृची नोंद केली असुन पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles