Friday, June 14, 2024

पिक अप मधून पडून युवकाचा मृत्यू नगर शहराबाहेरील बायपास रस्त्यावरील घटना

नगर (प्रतिनिधी) – धावत्या पिक अप गाडीचा दरवाजा अचानक उघडल्याने क्लिनर साईडला बसलेल्या युवकाचा रस्त्यावर पडून मृत्यू झाल्याची घटना शहराबाहेरील बायपास रस्त्यावर वाळूंज गावच्या शिवारात सोमवारी (दि.२७) पहाटे २ वाजेच्या सुमारास घडली. बाळाजी माधव साकटवाड (वय २९, रा. मुखेड, जि. नांदेड) असे मयताचे नाव आहे.

मयत बाळाजी व त्याचा चुलत भाऊ माधव ज्ञानोबा साकटवाड हे दोघे सोमवरी पहाटे पिकअप गाडी घेवून बायपास रस्त्याने जात होते. माधव हा गाडी चालवत होता तर बाळाजी हा क्लिनर साईडला बसलेला होता. वाळूंज शिवारातील पुलाखाली बाळाजी याच्या बाजूचा दरवाजा अचानक उघडला गेला. त्यामुळे तो पिकअप मधून खाली रस्त्यावर पडून गंभीर जखमी झाला. त्याला माधव याने तातडीने उपचारासाठी नगरच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी नेले. मात्र तेथील मेडिकल ऑफिसर डॉ. कुलकर्णी यांनी त्यास उपचारापूर्वीच मयत घोषित केले.

याबाबत नगर तालुका पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करत आहेत.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles