नगर – दौंड – मनमाड रेल्वे मार्गावर नगर जवळील निंबळक ते विळद रेल्वे स्टेशन दरम्यान रेल्वे गाडीतून प्रवास करणारा २१ वर्षीय युवक गाडी तून खाली पडून चाकाखाली चिरडून जागीच मयत झाल्याची घटना बुधवारी (दि. २१) दुपारी १२.१५ च्या सुमारास घडली. सोनू कुमार (वय २१, रा. सोनभद्रा, उत्तरप्रदेश) असे मयताचे नाव आहे.
मयत सोनू कुमार हा बुधवारी (दि.२१) सोलापूर – मिर्झापूर एक्सप्रेस गाडीने उत्तर प्रदेश कडे जात असताना गाडी नगर रेल्वे स्टेशन हून निंबळकच्या पुढे विळद रेल्वे स्टेशनच्या जवळ गेल्यावर तो अचानक रेल्वेगाडीतून खाली पडला. तो अडकून चाकाखाली आल्याने गंभीर रित्या जखमी झाला. त्याला रुग्णवाहिकेद्वारे नगरच्या जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. मात्र तेथील डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले. याबाबत एमआयडीसी पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.