अहमदनगर-संगमनेर तालुक्यातील तालुक्याच्या पठार भागातील कुरकुटवाडी येथील सचिन भानुदास कुरकुटे (वय २२) याचा २७ ऑक्टोबर रोजी मध्यरात्री संशयास्पद मृत्यू झाला होता. त्याच्या गळ्याला मोठी जखम झाली होती. बिबट्यानेच हा हल्ला केल्याचा दावा सचिनच्या कुटुंबाने केला होता. मात्र, अखेर या घटनेचा उलगडा झाला असून, मैत्रिणीला सोशल मीडियावर फ्रेंड रिक्वेस्ट पाठवल्याच्या रागातून मित्रानेच कोयत्याने गळा चिरून सचिनची हत्या केल्याचे समोर आले आहे.
याप्रकरणी घारगाव पोलिसांनी आरोपी गणेश बबन कुरकुटे वय २१, याला ताब्यात घेतले आहे