Tuesday, March 18, 2025

अहमदनगर-सोलापूर महामार्गावर भीषण अपघात ,युवक ठार

नगर-सोलापूर महामार्गावरील कर्जत तालुक्यातील कोकणगाव बायपासजवळ भीषण अपघात होऊन यामध्ये युवक ठार झाल्याची घटना घडली आहे. कोकणगाव जवळील बायपासजवळ शनिवारी दुपारी पिकअप क्र. एमएच 16 सीडी 5431 हा नगरकडून मिरजगावच्या दिशेने येत असतांना बायपासजवळ टायर पंचर झाल्याने महामार्गाच्या बाजूला थांबलेला होता.

यावेळी टायरचे पंचर काढत असतांना ड्रायव्हर मयूर भगवान मोरे (रा.जामखेड) नगरकडूनच मिरजगावच्या दिशेने येणारा आयशर टेम्पो एमएच 18 बीजी 1380 ने उभ्या असणार्‍या पिकअपला जोरदार धडक दिली. यावेळी पिकअपचे पंचर काढणारा मोरे जागीच ठार झाला. तसेच आयशर टेम्पो देखील रस्त्याच्या खाली जाऊन पडला.

या घटनेची माहिती समजताच मिरजगाव येथील सोनू बागवान, तसेच जीवन ज्योती रुग्णवाहिकेचे लहू बावडकर तातडीने घटनास्थळी आले.त्यांनी मोरे यास मिरजगाव येथील आरोग्य केंद्रामध्ये आणले व मिरजगाव पोलीस दूरक्षेत्राशी संपर्क साधत घटनेची माहिती दिली.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles