आंध्र प्रदेशच्या राजकारणात मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांच्या भगिनी वाय. एस. शर्मिला यांनी आज काँग्रेसमध्ये प्रवेश केला. आगामी लोकसभा आणि राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभुमीवर शर्मिला यांच्या काँग्रेसमधील प्रवेशाने पक्षाला राज्यात ताकद मिळाली आहे. शर्मिल यांनी त्यांचा वायएआर तेलंगणा हा पक्षही काँग्रेसमध्ये विलीन केला. त्यांच्या पक्षप्रवेशावेळी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, खासदार राहुल गांधी, केसी वेणुगोपाल उपस्थित होते.
शर्मिला यांच्या काँग्रेस प्रवेशानंतर राज्यात काँग्रेसची राजकीय ताकद वाढली आहे. शर्मिला यांनीही काँग्रेसमध्ये प्रवेश करून राजकारणात नवी इनिंग सुरू केली असली तरी त्यांच्यासाठी पुढील वाटचाल सोपी नाही. कारण, त्यांचे बंधू मु्ख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांनी राज्याच्या राजकारणावर जबरदस्त पकड निर्माण केली आहे.