Thursday, July 25, 2024

Zelio Ebikes ने लाँच केली नवीन स्टायलिश ई स्कूटर…

Zelio Ebikes इलेक्ट्रिक वाहन स्टार्टअप Zelio Ebikes ने भारतीय बाजारपेठेत ग्राहकांसाठी एक नवीन इलेक्ट्रिक स्कूटर लाँच केली आहे. या इलेक्ट्रिक स्कूटरचे नाव Zelio X Men असे आहे. या इलेक्ट्रिक स्कूटरच्या सर्व व्हेरिएंट्समध्ये कंपनीने 60/72V BLDC मोटर दिली आहे. ही स्कूटर खूप लाइटवेट आहे. या स्कूटरच वजन 80 किलोग्राम आहे, असा कंपनीचा दावा आहे. ही स्कूटर 180 किलोपर्यंत वजन उचलू शकते. तसेच, या इलेक्ट्रिक स्कूटरची किंमत 64 हजार 543 रुपये (एक्स-शोरूम) सुरु होते. या स्कूटरच्या टॉप वेरिएंटसाठी 87 हजार 573 रुपये (एक्स-शोरूम) खर्च करावे लागतील. इलेक्ट्रिक स्कूटर तुम्हाला एंटी-थेफ्ट अलार्म, रियर ड्रम ब्रेक, फ्रंट डिस्क ब्रेक आणि अलॉय व्हील्स सोबत मिळेल. त्या शिवाय, यात रिव्हर्स गियर, पार्किंग स्विच, यूएसबी चार्जर, हायड्रोलिक शॉक एब्जॉर्बर, सेंट्रल लॉकिंग आणि डिजिटल डिस्प्ले सारखे खास फीचर्स मिळतील.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles