Wednesday, April 17, 2024

नगर जिल्ह्यातील जिल्हा परिषद केंद्रिय प्राथमिक शालेय विद्यार्थ्यांनी पेटवली अनोखी होळी…

ढोरेगावच्या विद्यार्थ्यांनी पेटवली कच-याची होळी. नैसर्गिक रंग उधळून साजरे करणार धूलीवंदन. पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी घेतली जलप्रतिज्ञा.

जिल्हा परिषद केंद्रिय प्राथमिक शाळा ढोरेगावच्या विद्यार्थ्यांनी शालेय परिसरातील कच-याची होळी पेटवून समाजासमोर आदर्श ठेवला.तर धूलीवंदनात केमिकलयुक्त रंगाऐवजी नैसर्गिक रंगाचा वापर करत पर्यावरण बचावचा संदेश देणार आहेत.तर पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी विद्यार्थ्यांनी जलप्रतिज्ञा देखील घेतली.
शनिवार २३ रोजी शालेय परिपाठानंतर शाळा व परिसरातील कचरा व प्लॅस्टीक जमा करून शाळेच्या आवारातच त्याची होळी पेटवून समाजासमोर आदर्श निर्माण केला.
याप्रसंगी बोलतांना शिक्षण विस्तार अधिकारी अरविंद कापसे म्हणाले की,विद्यार्थ्यांनी आपल्यातील अवगुणाची होळी करून सुसंस्कारक्षम बनत विज्ञानाची कास धरावी.होळी साजरी करतांना केमिकलयुक्त रंगांमुळे मानवी शरीरावर मोठा विपरीत परिणाम होत असून पर्यावरणाच्या रक्षणासाठी घरीच नैसर्गिक रंग बनवून नैसर्गिक रंगाची उधळण करत धुलीवंदन साजरे करावे असे आवाहन केले.
यावेळी वनपरिक्षेत्र अधिकारी छाया बाणखेले यांनी रंगांचा उत्सव,रंगोत्सव म्हणजे रंगपंचमी अवघ्या दोन दिवसांवर आलेली असताना नैसर्गिक रंगांचा वापर करत ती अधिक “रंगतदार’पणे कशी साजरी करता येईल? कृत्रिम रंगात वापरण्यात येणाऱ्या रसायनांचा त्वचा, डोळे, केस यांवर परिणाम होऊ नये,म्हणून घरात उपलब्ध असणाऱ्या साहित्याचा वापर करून घरच्या घरी नैसर्गिक रंग कसे तयार करावेत ? पळस,जास्वंदाची फुले,बीट,घरातील उपलब्ध साहित्यापासून रंग कसा बनवायचा यासाठीच्या काही टिप्स,माहिती प्रात्यक्षिकासह दिली.
नैसर्गिक रंग बनवण्याची विद्यार्थ्यांची कार्यशाळाच श्रीमती बाणखेले यांनी घेत पालक, कोथिंबिर, पुदीना, बीट, हळद, मेंदी, कांद्याची साल, पळसाची पाने, पारिजाताच्या फुलांचे देठ, कात आदी गोष्टींचा वापर करुन नैसर्गिक रंग बनवण्याचे प्रशिक्षण या कार्यशाळेतून देण्यात आले.हे पदार्थ बारीक चिरून पाण्यात मिसळले की विविध रंग तयार करता येतात.
पदवीधर शिक्षक राजेश हिवाळे यांनी पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी विद्यार्थ्यांकडून जलप्रतिज्ञा वदवून घेतली.
यावेळी सरपंच अयुब पटेल,शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष खलील पटेल,वनपरिक्षेत्र अधिकारी छाया बाणखेले,शिक्षण विस्तार अधिकारी अरविंद कापसे,वनपाल एन.सी.तगरे,वनरक्षक अविनाश जायभाये,ग्रामपंचायत सदस्य योगेश शेवाळे,ग्रामसेविका शितल राऊत,केंद्रप्रमुख तथा केंद्रीय मुख्याध्यापिका अंजली पुऱ्हे यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या यशस्वीते व आयोजनासाठी शिक्षक राजेश हिवाळे,राजश्री वानखडे,शंकर राऊत,बसवराज उदे,रीना लोहार,भारती भोये,वंदना निधोनकर,मनोज मस्के यांनी पुढाकार घेतला.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles