१५ ऑगस्ट रोजी संपूर्ण देशभरात ७८ वा स्वातंत्र्य दिवस साजरा करण्यात आला. या दिवशी जागोजागी तिरंगा ध्वज फडकावून स्वातंत्र्यदिनाचा उत्सव साजरा केला गेला. सध्या सोशल मीडियावर या दिवसाचे अनेक व्हिडीओ आणि फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत, ज्यात काही जण सुंदर गाणी गाताना दिसतात तर काही जण गाणी गाताना दिसतात. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होतोय, ज्यात एका जिल्हा परिषदेच्या शाळेतील मुलगा असं काहीतरी करतोय जे पाहून तुम्हालाही हसू येईल.
जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकणारी मुलं नेहमीच वेगवेगळ्या प्रकारच्या कला सादर करताना दिसतात. ज्यामध्ये कधी ते सुंदर डान्स करताना दिसतात, तर काही जण सुंदर भाषण करताना दिसतात. सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओतील मुलगाही त्याची हीच कला सादर करताना दिसत आहे.सध्या हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @newarisir_res या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे.