Video: झोमॅटो डिलिव्हरी बॉयचा नाद…गाडी सोडून घोड्यावर स्वार…

0
27

केंद्र सरकारच्या नव्या वाहन कायद्या विरोधात म्हणून देशभरातील वाहनचालकांनी ३ दिवसीय संप पुकारला आहे. या संपामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या पुरवठ्यावर परिणाम झाला असून पेट्रोल पंपाबाहेर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र दिसत आहे. या समस्येवर एका झोमॅटो डिलीव्हरी बॉयने खतरनाक पर्याय शोधून काढलायं. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
सध्या सोशल मीडियावर एका झोमॅटो डिलिव्हरी बॉयचा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओ व्हायरल होण्याचं कारण म्हणजे हा पठ्ठ्या चक्क घोड्यावर स्वार होऊन ग्राहकांची ऑर्डर्स पोहोच करताना दिसत आहे. रस्त्यावर गाड्यांची वर्दळ असतानाच त्याचा हा घोड्यावर बसून ऑर्डर पोहोचवण्यासाठी चाललेला राजेशाही प्रवास पाहून नेटकरीही अवाक झाले आहेत.

व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ तेलंगणातील हैदराबादमधील चंगलचुडा भागातील असल्याचे सांगण्यात येत आहे. या खास स्टाईलचे कारण विचारल्यानंतर तरुणाने पेट्रोल पंपावर लांबच लांब रांगा लागल्या होत्या. बाईकमध्ये पेट्रोल भरण्यास उशीर लागत असल्याने हा मार्ग अवलंबल्याचे सांगितले.