झोमॅटो, फूड पांडा, उबर इट्स आणि स्विगीसारख्या ऑनलाईन फूड डिलिव्हरी सेवा पुरवणाऱ्या कंपन्या फार लोकप्रिय झाल्या आहेत. या कंपन्यांचे डिलिव्हरी एक्झिक्युटिव्ह घरोघरी अन्न पोहच करून ग्राहकांना सेवा देतात. एकदम गरीब आणि गरजू व्यक्तीच फूड डिलिव्हरीचं काम करतात, असा समज होता. मात्र, आता अनेक उच्चशिक्षित तरुण-तरुणीही पार्टटाईम जॉब म्हणून हे काम करतात. अशातच झोमॅटोची डिलिव्हरी बॅग आणि टी शर्ट घातलेल्या एका तरुणीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. विशेष म्हणजे ही तरुणी साध्यासुध्या नाही तर एका सुपरबाईकवर स्वार आहे.
झोमॅटोची डिलिव्हरी बॅग घेऊन सुपरबाईक चालवणाऱ्या तरुणीचा व्हिडिओ इंदूर शहरातील असल्याचं म्हटलं जात आहे.