शासकीय शाळा त्याही ग्रामीण भागात असतील तर तिथल्या शिक्षणाच्या दर्जाबाबत प्रश्न उपस्थित केले जातात. मात्र याही परिस्थितीत जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक कल्पकता दाखवून शैक्षणिक दर्जा वाढवण्याबरोबरच मुलांसाठी शाळेतील वातावरण आनंददायी बनवतात. अशाच एका जिल्हा परिषद शाळेतील व्हिडिओ समोर आला आहे. यात शिक्षक मुलांसमवेत डान्स करून त्यांना गाणी शिकवत आहेत. सर्वच शिक्षक या उपक्रमात सहभागी झाल्याचे व्हिडिओत पहायला मिळते.
- Advertisement -