मुंबई -शालेय शिक्षण विभागाने शासन निर्णय प्रसिद्ध केला. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांतील २० किंवा २०पेक्षा कमी पटसंख्येच्या शाळांसाठी मंजुर केलेल्या दोन शिक्षकांपैकी एक शिक्षक सेवानिवृत्त शिक्षक, डी.एड., बी.एड. पात्रताधारक बेरोजगार उमेदवारांची १५ हजार रुपये दरमहा वेतनावर कंत्राटी तत्त्वावर नेमणूक करण्याचा निर्णय ५ सप्टेंबर रोजी शालेय शिक्षण विभागाने प्रसिद्ध केला होता. शिक्षण क्षेत्रातून, शिक्षक भरतीच्या प्रतीक्षेत असलेल्या पात्रताधारकांकडून या निर्णयावर टीकेची झोड उठली होती. त्यानंतर आता शालेय शिक्षण विभागाने या निर्णयात बदल केला. तसेच ५ सप्टेंबर रोजीचा निर्णय रद्द केला आहे. नव्या निर्णयानुसार, २० किंवा २०पेक्षा कमी पटसंख्येच्या शाळांऐवजी आता १० किंवा १०पेक्षा कमी पटसंख्येच्या शाळांमध्ये मंजुर शिक्षकांपैकी शिक्षक डी.एड. बी.एड. पात्रताधारक बेरोजगार उमेदवारांची नियुक्ती करण्यात येणार आहे. त्यामुळे सेवानिवृत्त शिक्षकांना वगळण्यात आले आहे.
प्रत्येक जिल्ह्यासाठी प्राथमिक शिक्षणाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी पात्र उमेदवारांतून अर्ज मागवून नियुक्ती आदेश देण्याबाबत स्पष्ट करण्यात आले आहे.
कंत्राटी शिक्षक म्हणून बेरोजगार बी.एड., डीएड धारकांना संधी, सेवानिवृत्तांना वगळले..
Comments are closed.
- Advertisement -
Madhyamik shikshak