अग्नी-3 या मध्यम पल्ल्याच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची यशस्वी सराव चाचणी

0
37

नवी दिल्ली, 23 नोव्हेंबर 2022

ओडिशातील एपीजे अब्दुल कलाम तळावरून आज भारताने अग्नी-3 या मध्यम पल्ल्याच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची यशस्वी प्रशिक्षण चाचणी घेतली. स्ट्रॅटेजिक फोर्सेस कमांडच्या देखरेखीखाली दैनंदिन प्रशिक्षणाचा भाग म्हणून ही चाचणी घेण्यात आली. पूर्वनिर्धारित पल्ला आणि प्रणालीची सर्व प्रमाणित असलेली ऑपरेशनल परिमाणे तपासून पाहण्यासाठी अशा प्रकारच्या चाचण्या घेतल्या जातात.