नगर: पारनेर शहराच्या नगराध्यक्ष पदी विजय औटी व उपनगराध्यक्ष म्हणुन सौ.सुरेखाताई अर्जुन भालेकर यांनी अधिकृतपणे पदभार स्वीकारला. आमदार निलेश लंके यांच्या उपस्थितीत दोघांनी पदभार स्वीकारला.
यावेळी आमदार लंके म्हणाले की,
पारनेर शहराच्या विकासाचा बॅकलॉग भरुन काढण्याच्या अनुषंगाने आगामी काळात काम केले जाईल.पदाधिकारी आणि अधिकारी हे दोन चाके आहेत. त्यांनी सोबत काम केल्यानंतर नक्कीच विकास जलद गतीने करता येईल. पारनेर शहरात पिण्याच्या पाण्याचा प्रश्नाबरोबरच इतर अनेक समस्या आहेत. त्या निकाली काढण्यासाठी शासकीय पातळीवर पाठपुरावा केला जाईल असा शब्दही यावेळी दिला.विरोधात काम करणे सोपे असते मात्र जेव्हा सत्तेत आपण येतो तेव्हा जबाबदारी आणखी वाढते. त्याचबरोबर नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष आणि नगरसेवक हे सर्व जनतेचे असतात. त्यामुळे कोणताही दुजाभाव न करता पारनेर शहरातील सर्वांची कामे झाली पाहिजे. या शहराच्या विकास कामांकरिता आमदार म्हणून आपल्या दोन पावले पुढे जावुन काम करेल.
यावेळी श्री.गंगाराम बेलकर,श्री.चंदू चेडे,श्री.अर्जुन भालेकर,श्री.सुदाम पवार,श्री.राया औटी,श्री.विजय डोळ,श्री.राहुल झावरे,श्री.पोटघन मेजर,श्री.नंदकुमार औटी,श्री.बाळासाहेब नगरे,श्री.बबन चौरे,नगरसेवक नितीन अडसूळ,नगरसेवक योगेश मते,अशोक चेडे,सुभाष शिंदे,श्री.भूषण शेलार,निता औटी,प्रियांका औटी,विद्या कावरे,हिमानी नगरे,डॉ.बाळासाहेब कावरे,श्री.श्रीकांत चौरे व इतर सहकारी,नगरसेवक उपस्थित होते.