उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूकीत EVM मशीनमध्ये घोळ झाला. त्यामुळे १४२ जागांसाठी पुन्हा मदतान होईल. परिणामी योगी आदित्यनाथ यांचं मुख्यमंत्रीपद जाण्याची शक्यता आहे. असा दावा करणारा मेसेज समाज माध्यमांमध्ये व्हायरल झाला आहे परंतु PIB फॅक्ट चेकने दिलेल्या माहितीनुसार हा दावा पुर्णपणे खोटा आहे. अशा प्रकारचा कुठलाही घोळ निवडणूकीत झाला नव्हता. शिवाय जनतेनं दिलेला निकाल अंतिम आहे. त्यामुळे पुन्हा एकदा मतदान होणार नाही. अशा प्रकारच्या खोट्या मेसेज किंवा व्हिडीओवर विश्वास ठेवू नये.