नगर: जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील राजूर येथे विशेष निवडणूक पार पडलीय. दहा वर्षापूर्वी बुजवलेली विहीर खुली करण्यासाठी मतदान पार पडलंय. गावकऱ्यांमध्ये विहीर पुन्हा खोदण्यासंदर्भात मतमतांतरे होती. अखेर ग्रामंपचायंतीनं विशेष ग्रामसभा बोलावली. या विशेष ग्रामसभेत मतदान पार पडलं. विहीर खोदण्याच्या बाजूनं आणि विरोधात गावकऱ्यांनी मतदान केलं. अखेर, गावकऱ्यांनी विहीर खोदण्याच्या बाजूनं मतदान केलं. विशेष म्हणजे मतदानामध्ये महिला ग्रामस्थांची संख्या मोठ्या प्रमाणावर होती.
विहीर खोदायची की नाही,मतदानातून निकाल
अहमदनगर जिल्ह्यातील राजूर गावात विहीरीसाठी विशेष मतदान घेण्यात आलय. गावाला पाणीपुरवठा करणारी विहीर दहा वर्षापूर्वी बुजवण्यात आली होती. बुजवलेली विहीर पुन्हा खुली करावी किंवा न करावी याबद्दल मतमंतातरे असल्याने आज मतदान घेऊन याचा निकाल लावण्यात आलाय.