एमपीएसी युपीएससी परीक्षा देणारे विदयार्थी हे जिल्हा परीषद शाळेचे

0
952

एमपीएसी युपीएससी परीक्षा देणारे विदयार्थी हे जिल्हा परीषद शाळेचे -आ. सुधीर तांबे
अहमदनगर -देश घडविण्याचे काम शिक्षका मार्फत होत असते .
जिल्हा परीषद शाळेमधील जो काही बदल झाला तो शिक्षकामुळे . लोकसहभागातून शिक्षकांनी शाळा चांगल्या सुधारण्याचे काम केले. शिक्षकांनी मुख्यालयी राहण्याची गरज नाही वेळेवर शाळेत येणे शाळेचा दर्जा सुधारणे हे महत्वाचे आहे . एमपीएसी , युपीएससी परीक्षा देणारे हे जिल्हा परिषदे मध्ये शिक्षण घेणारे विद्यार्थी आहेत . ग्रामीण भागातीत विद्यार्थी अधिकारी झाला तर तो सर्व क्षेत्रामध्ये अग्रेसर असतो असे प्रतिपादन आमदार सुधीर तांबे यांनी केले.
खारेकर्जुने जिल्हा परिषद शाळेच्या मुख्यध्यापिका सुंनदा आडसूळ, खातगाव शाळेचे मुख्यध्यापक प्रभाकर झेंडे खातगाव , निमगाव शाळेचे मुख्यध्यापक शिवाजी तांबे यांचा सेवापूर्ती कार्यक्रम आयोजीत करण्यात आला यावेळी ते बोलत होते . या कार्यक्रमासाठी उपस्थित होते . यावेळी आ. लंके म्हणाले आई वडील मुलांना संस्कार देतात त्या मुंलाना घडवण्याचे काम शिक्षक करतात. आई, वडील, शिक्षक हे तीन घटकच विद्यार्थीचे आयुष्य घडवतात . गोरगरिब घरातील विद्यार्थीना तसेच मातीचे गोळे घडवण्याचे पवित्र काम शिक्षक करतात .आपला मतदार संघ राज्याला शिस क पुरवणार असणार असे लंके यांनी यावेळी सांगीतले. या कार्यक्रमासाठी जिल्हा परीषद माजी उपाध्यक्ष प्रताप शेळके , माजी अर्थ बांधकाम समिती अध्यक्ष रावसाहेब शेळके , माजी जिल्हा परीषद सदस्य अरुण होळकर, कॉंग्रेस तालुका अध्यक्ष संपत म्हस्के , केंद्र प्रमुख रविंद्र कापरे, ज्ञानदेव लंके रावसाहेब रोहकले, बापू तांबे, बाबा पवार, राजेंद्र निमसे, आबा लोंढे, रामदास सोनवणे ,डॉ. सुनील गंधे, सुनिल सोनवणे, सेवानिवृत्त केंद्र प्रमुख गोरक्षनाथ सोनवणे, , एकनाथ झावरे , दिपक सोनवणे, उद्योजक बाळासाहेब शहाणे , रा. वि शिंदे, संजय धामणे, संपत म्हस्के, केंद्र प्रमुख दळवी, विकास डावखरे, ,मंजुषा नरवडे, सह नातेवाईक आप्तउष्ठ मोठया संख्येने उपस्थित होते .
पदमश्री पोपटराव पवार यांनी सेवानिवृत्ती शुभेच्छा दिल्या.