ऑस्ट्रेलियाचा उडवला धुव्वा! भारताचा एक डाव अन १३२ धावांनी दणदणीत विजय

0
26

भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात बॉर्डर गावसकर ट्रॉफीतील पहिला सामना नागपुरात पार पडला. शनिवारी पार पडलेल्या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियावर एक डाव आणि १३२ धावांनी विजय मिळवला. भारतीय संघाने पहिल्या डावाच्या जोरावर २२३ धावांची आघाडी घेतली होती. परंतु दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाचा संघ ३२.२ षटकात ९१ धावांवर आटोपला. भारताकडून आर आश्विनने सर्वाधिक ८ विकेट्स घेत आस्ट्रेलिया संघाला खिंडार पाडली. भारतीय संघाने आता चार सामन्यांच्या मालिकेत १- ० अशी आघाडी घेतली आहे.

पहिल्या डावात ४०० धावा केल्यानंतर टीम इंडियाला २२३ धावांची आघाडी मिळाली. ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावात सातत्याने विकेट गमावल्या. परिणामी तिसऱ्या दिवशीच संघाला मानहानीकारक पराभवाला सामोरे जावे लागले. दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाकडून सर्वाधिक धावांचे योगदान दिले. त्याने ५१ चेंडूत २ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने नाबाद २५ धावा केल्या. त्याचबरोबर भारताकडून आर आश्विनने सर्वाधिक ५ विकेट्स घेत भारतीय संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केला.