कर्डिले यांनी शिवसेनेत यावं आम्ही स्वागतच करू….

0
1574

नगर: माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांची सत्तेवर निष्ठा तर आमची पक्षावर निष्ठा आहे. कर्डिले यांना सत्तेशिवाय झोप येत नाही. त्यांना शिवसेनेने मंत्री केले होते. पुन्हा सत्ता लागत असेल तर त्यांनी खुशाल शिवसेनेत यावे, आम्ही त्यांचे स्वागतच करू, असे आवाहन शिवसेनेचे जिल्हा प्रमुख रावसाहेब खेवरे यांनी केले.
राहुरी तालुक्यातील कानडगाव येथील सोसायटीच्या विजयी उमेदवारांचा सत्कार प्रसंगी ते बोलत होते. खेवरे म्हणाले, माजी आमदार शिवाजीराव कर्डिले यांना सतत सत्तेशिवाय झोप येत नाही. सत्ता नसेल तर ते बेचैन होतात. त्यांना पुन्हा सत्ता लागत असेल तर आमच्या पक्षात आले तर निश्चितच सत्ता दिली जाईल. आम्ही आजपर्यंत पक्षावर निष्ठा ठेवलेली आहे. कधीही पक्ष बदलणारे आम्ही नाही. असे खेवरे म्हणाले. सोसायटीच्या नूतन संचालकांनी संस्थेचा कारभार चांगल्या पद्धतीने करून सभासदांची कुठल्याही प्रकारची अडवणूक होणार नाही, याची काळजी घेऊन कारभार करावा, असे ते म्हणाले.