कॉंग्रेस अध्यक्षपद निवडणूक… मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांची माघार…

0
418

राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीतून माघार घेतली आहे. अशोक गहलोत यांनी स्वत: निवडणुक न लढवण्याची घोषणा केली आहे.

अशोक गहलोत यांनी दिल्लीत हायकमांड सोनिया गांधी यांची भेट घेतली. या भेटीनंतर गहलोत यांनी आपला निर्णय जाहीर केला आहे. सध्या निर्माण झालेला राजकीय पेच पाहता मी अध्यक्षपदाची निवडणुक लढवणार नाही असे गहलोत यांनी जाहीर केले.

एक व्यक्ती, एक पद हे कॉंग्रेसचे धोरण अआहे. यामुळे काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी गहलोत यांना राजस्थानच्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागणार होता.

मात्र, आता अशोक गहलोत यांनी काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीतून माघार घेतल्यामुळे त्यांचे मुख्यमंत्रीपद सुरक्षित राहणार असल्याची चर्चा रंगली आहे.