नवी दिल्ली: उत्तर प्रदेश, उत्तराखंड, गोवा, पंजाब आणि मणिपूर या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका नुकत्याच पार पडल्या. या विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसला दारुण पराभवाला सामोरं जावं लागलं. या पाच राज्यातील पराभवाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस वर्किंग कमिटीची नवी दिल्लीत बैठक पार पडली या बैठकींनंतर काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी यांनी पाचही राज्यांच्या प्रदेशाध्यांना राजीनामा द्यायला सांगितला आहे. काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी यासंदर्भात ट्विट द्वारे माहिती दिली आहे. आता काँग्रेस पाच राज्यांच्या पराभवासंदर्भात आणखी कोणती पावलं उचलणार हे पाहावं लागणार आहे.






