शिर्डी : गुजरात एटीएसनं पाकिस्तानमधील दहशतवादी संघटनेची संबंधित असलेल्या अतिरेक्यांना ताब्यात घेतलं होतं. त्यानंतर त्यांची कसून चौकशी करण्यात आली. या चौकशीतून धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. यानंतर आता असंख्य लोकांना श्रद्धास्थान असलेल्या साईनगरी शिर्डीवर दहशतवाद्यांचा डोळा होता, ही बाबही समोर आली आहे. दुबईवरुन आलेल्या अतिरेक्यांनी शिर्डीत रेकी केल्याची कबुली दिली आहे. ज्या दहशतवादी संघटनेशी हे अतिरेकी संबंधित आहे, ती संघटना पाकिस्तानातील असल्याची माहिती गुजरात एटीएसनं दिली आहे.
याआधीही अनेकदा शिर्डी संस्थानला धमकीचे फोन आणि मेल आल्याचं पाहिलं देलं आहे. अशातच आता समोर आलेल्या माहितीनंतर मंदिर प्रशासनानं सुरक्षा व्यवस्थेतही वाढ केली आहे. गुजरात दहशतवाद विरोधी पथकाने काही अतिरेक्यांना अटक केली होती. दुबईतून या अतिरेक्यांना अटक करण्यात आली होती. अटक करण्यात आलेल्याकडून शिर्डी येथील मूळचे रहिवासी आणि सध्या दिल्ली येथे वास्तव्यास असणाऱ्या एका हिंदी न्यूज चॅनेलचे संपादक यांच्या दिल्ली येथील सुदर्शन टिव्हीचे कार्यालय आणि शिर्डी येथील त्यांच्या घरी रेकी केल्याची कबुली दिली आहे. गुजरात एटीएसनं केलेल्या दाव्यानुसार, अटक करण्यात आलेल्यांचं पाकिस्तान दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याचं सांगितलं जातंय. आता अटर करण्यात आलेल्या सगळ्यांची कसून चौकशी केली जाते आहे. या खळबळजनक कबुलीनंतर आता शिर्डीतील बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे.