गोविंद मोकाटेची सोसायटीत सत्ता गेली माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांचे वर्चस्व
इमामपूर सोसायटीमध्ये कर्डिले गटाचे वर्चस्व
गोविंद मोकाटे यांच्या पॅनेलचा पराभव
नगर तालुका- नगर तालुक्यातील इमामपूर गावच्या सेवा संस्थेच्या निवडणुकीकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून होते. येथे माजी आमदार शिवाजीराव कर्डिले गटाचे सात सदस्य विजयी झाले असून सत्ता राखण्यात यश मिळवले आहे.
इमामपूर गाव हे विद्यमान जिल्हा परिषद सदस्या भाग्यश्री मोकाटे यांचे गाव असल्याने येथील सोसायटीच्या निवडणुकीकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून होते. इमामपूर येथे गणेश आवारे यांनी कर्डिले गटाच्या वतीने पॅनल उभा केला होता. गणेश आवारे यांच्या नेतृत्वाखाली लढल्या गेलेल्या पॅनलचे सात सदस्य विजयी झाले असून सोसायटीमध्ये त्यांची सत्ता आली आहे. इमामपूर सेवा संस्थेसाठी ४३७ मतदारांपैकी ३९८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता.
महा विकास आघाडीच्या वतीने गोविंद मोकाटे यांच्या पॅनलला पाच जागांवर विजय मिळाला आहे. माजी पंचायत समिती सदस्य गोविंद मोकाटे यांचा पॅनल पराभूत झाला असला तरी स्वतः गोविंद मोकाटे मात्र विजयी झाले आहेत.
इमामपूर सोसायटीत गेल्या १५ वर्षापासून माजी आमदार कर्डिले गटाची सत्ता होती. चालू वर्षी कर्डिले गटाचे नेतृत्व युवा नेते गणेश आवारे यांनी केले होते. येथे कर्डिले गटाने मिळवलेली सत्ता ही महाविकासआघाडी साठी धक्कादायक असा निकाल आहे.
माजी आमदार कर्डिले यांच्यावर जनतेचा विश्वास
माजी आमदार शिवाजीराव कर्डिले यांना शेतकऱ्यांविषयी असलेली आपुलकी, प्रेम यामुळे मतदार आमच्या पाठीशी उभे राहिले. कर्डिले यांनी शेतकरी हितासाठी घेतलेल्या निर्णयामुळे इमामपुर गावात सत्ता राखली गेली. मतदारांच्या विश्वासाला तडा जाऊ न देता सेवा संस्थेचा कारभार स्वच्छ व पारदर्शी करणार तसेच शेतकरी हिताचे निर्णय घेण्यात येतील.
….गणेश आवारे (युवा नेते)