डॉ.पी.डी. गांडाळ यांना आरोग्यभूषण पुरस्कार प्रदान
अहमदनगर (प्रतिनिधी ) : येथील नाशिक विभाग आरोग्यसेवा (हिवताप) सहाय्यक संचालक डॉ.पी.डी.गांडाळ यांना सरपंच सेवा संघा तर्फे राज्यस्तरीय आरोग्यभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.आरोग्यविभागात उत्कृष्ट कार्य करून सामाजिक जाणिवेतून समाजात कार्यरत असे डॉ.गांडाळ हे सध्या येथे नाशिक विभागाचे सहाय्यक संचालक म्हणून कार्यरत आहेत.
राज्यातील सामाजिक,शैक्षणिकसह विविध विभागात सर्वोत्कृष्ठ कार्यकारणाऱ्या व्यक्तींमधून हि निवड करण्यात आली.पद्मश्री बीजमाता राहीबाई पोपेरे,आ. निलेश लंके ,आदर्श सरपंच भास्करराव पेरे पाटिल,सरपंच सेवा संघाचे संस्थापक यादवराव पावसे,युवानेते बाबासाहेब पावसे आदी मान्यवर पुरस्कार वितरण सोहोळ्यास उपस्थित होते.माउली संकुल सभागृह (नगर ) येथे हा राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहोळा आयोजित करण्यात आला होता.