केरळची राजधानी तिरूवनंतपुरमच्या महापौर आर्या राजेंद्रन आणि बलुसेरीचे आमदार सचिन देव यांचीही अशीच कहाणी आहे. दोघे विवाह करणार असून रविवारी बड्या नेत्यांच्या उपस्थित दोघांचा साखरपुडा पार पडला. आर्या या देशातील सर्वात कमी वयाच्या महापौर आहेत. तर सचिन देव हेही केरळमधील सर्वात तरूण आमदार आहेत.
मागील महिन्यातच या जोडीने विवाहाची घोषणा केली होती. दोघेही कम्युनिस्ट पक्षाचे सदस्य नेते आहेत. पक्षाच्या बालासंगम या विद्यार्थी विभागापासून ते एकमेकांना ओळख होते. संघटनेत काम करत असतानाच त्यांची ओळख वाढत गेली आणि त्याचं रुपांतर प्रेमात झालं. आर्य़ा या केवळ 21 वर्षांच्या असताना महापौर बनल्याने देशभर त्यांच्या नावाची चर्चा होती. त्यांना 100 पैकी 54 मतं मिळाली होती.