नगर जिल्ह्यातील भुमी अभिलेख कार्यालयातील दोन लिपिक ‘एसीबी’च्या जाळ्यात

0
1954

नगर जिल्ह्यातील भुमीलेख कार्यालयातील दोन लिपिक ‘एसीबी’च्या जाळ्यात

तक्रारदार- पुरुष वय- ५८ रा- अंबी जळगाव, ता- कर्जत जि.अहमदनगर
*आरोपी =१) सुनिल झिप्रू नागरे, वय ४८ वर्ष, धंदा- नौकरी, मुख्यालय सहायक, वर्ग- ३,
राहणार- हल्ली मुक्काम- भैलुमे चाळ, शिवपार्वती मंगल कार्यालय जवळ, कर्जत.
मूळ राहणार- फ्लॅट नं १०, साई कृष्णा सोसायटी, लोकमान्य नगर, नाशिक रोड, जिल्हा- नाशिक
२) कमलाकर वसंत पवार, वय ५२
धंदा- नौकरी, भूकरमापक, वर्ग-३
दोघे नेमणूक भुमी अभिलेख कार्यालय, कर्जत, जिल्हा- अहमदनगर.
राहणार- प्लॉट नं ५८, शारदा मंगल कार्यालय शेजारी, शाहूनगर, केडगाव, अहमदनगर
लाचेची मागणी- २५०००/-₹ तडजोडी अंती ₹ २००००/-
लाच स्विकारली २००००/ ₹
हस्तगत रक्कम- २००००/-रु
लाचेची मागणी – ता.०२/०३/२०२२
लाच स्विकारली -ता. ०३/०३/२०२२
लाचेचे कारण -.तक्रारदार यांची पत्नी व इतर दोन यांची माहिजळगाव शिवारात असलेल्या जमिनीची भुमी अभिलेख कार्यालय, कर्जत यांचेकडून मोजणी करुन घेतली होती. मोजणी नुसार तिन्ही खातेदार यांचे पोट हिस्से करुन हद्दीच्या खुणा दर्शविने करिता यातील दोन्ही आरोपी लोकसेवक हे ₹ २५०००/- ची लाचेची मागणी करत असले बाबत तक्रारदार यांनी दिलेल्या तक्रारीवरून दिनांक ०२/०३/२२रोजी केलेल्या लाच मागणी पडताळणी मध्ये दोन्ही आरोपी लोकसेवक यांनी पंचासमक्ष तक्रारदार यांचे कडे ₹ २५०००/- लाचेची मागणी करुन तडजोडी अंती ₹ २००००/- लाचेची रक्कम स्विकारण्याचे मान्य केले. त्यावरून आज दिनांक ०३/०३/२२रोजी भूमी अभिलेख कार्यालय कर्जत येथे आयोजित केलेल्या लाचेच्या सापळा कारवाई दरम्यान यातील आरोपी लोकसेवक क्रमांक १ याने पंचासमक्ष तक्रारदार यांचे कडुन ₹ २००००/- लाचेची रक्कम स्विकारली असता दोन्ही आरोपी लोकसेवक यांना रंगेहाथ पकडण्यात आले.
पोलीस स्टेशन कर्जत येथे गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू आहे.
हॅश व्हॅल्यू घेण्यात आली असून फोटोग्राफ घेण्यात आले आहेत.
सापळा अधिकारी:- शरद गोर्डे, पोलीस निरीक्षक, ला.प्र. वि. अहमदनगर
पर्यवेक्षण अधिकारी* हरीष खेडकर, पोलीस उप अधीक्षक, ला.प्र.वि, अहमदनगर
सापळा पथक:- पो नाईक रमेश चौधरी, पो अंमलदार वैभव पांढरे, रविंद्र निमसे,चालक पो ह. हरुन शेख, राहुल डोळसे.
*मार्गदर्शक -*मा.श्री सुनील कडासने सो, पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक
मा. नारायण न्याहळदे सो, अपर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि नाशिक.
मा:- सतिश भामरे, वाचक पोलीस उपअधीक्षक, ला.प्र.वि.नाशिक परिक्षेत्र, नाशिक.
*आरोपीचे सक्षम अधिकारी:- उपसंचालक, भूमी अभिलेख, नाशिक विभाग, नाशिक.