नगर तालुक्यातील आणखी एक सोसायटी माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांच्या गटाच्या ताब्यात
नगर तालुक्यातील निमगाव वाघा सेवा संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीत महाविकास आघाडीला सपशेल धोबीपछाड देत मा.मंत्री शिवाजीराव कर्डिले गटाने सत्ता मिळवली.
अरुण फलके, भारत पाटील फलके, अरुण कापसे, माजी सरपंच मच्छिंद्र डोंगरे, अनिल डोंगरे, संजय फलके, संजय कापसे, संतोष फलके, कुमार फलके यांच्या नेतृत्वाखाली पार पडलेल्या या निवडणुकीत बाळासाहेब किसन जाधव अनशाबापू धोंडीबा फलके, अनिल भाऊसाहेब फलके, मंगल दत्तात्रय फलके ,अजय ठाणगे, अतुल फलके, दिलीप लक्ष्मण जाधव, संजय डोंगरे ,मारुती कापसे, भाऊसाहेब केदार, जालिंदर आतकर ,एकनाथ भुसारे व पोपट बाबाजी कापसे हे सोसायटी सदस्य म्हणुन निवडून आले.
या सर्वांचे मा.मंत्री शिवाजीराव कर्डिले साहेबांनी अभिनंदन केले. तसेच सत्कार करून भावी कार्यासाठी शुभेच्छाही दिल्या.याप्रसंगी बाजार समिती संचालक शिवाजी कार्ले,रावसाहेब कार्ले चासचे सरपंच राजेंद्र गावखरे, उपस्थित होते.