तीन दिवसांपूर्वी नगर – दौंड रोडवर गणेश चोरमले (रा वांगदारी) हा छोटा हत्तीत कांदे घेऊन जात असताना पाठीमागून धडकून ठार झाला. आणि आज पहाटे 2,30 च्या सुमारास दोन ट्रॅक चा अपघात होऊन एक चालक ठार झाला आहे. त्या समयी संदेश कार्ले, गोविंद धामणे,रोहन कांबळे,मोहन कांबळे, प्रतीक काळे,अंबुलन्स ड्रायव्हर विजू,व इतर अनेक नागरिकांनी मदत केली. त्याच प्रमाणे नगर तालूका पोलीस ही तातडीने घटनास्थळी दाखल झाले व मदत केली. वारंवार दौंड रोड वर होणारे अपघात व जीवितहानी ही चिंतेची बाब आहे,त्यास बेशिस्त व वेगाने वाहतूक ,कडेचा पट्टा सोडून मधूनच चालणारे दुचाकी वाहन चालकही अपघातास कारणीभूत आहेत.