पाकिस्तान हादरले…मशिदीतील स्फोटात ३० ठार

0
729

पेशावर : पाकिस्तानातील पेशावर येथील मशिदीत मोठा स्फोट झाला आहे. ज्यामध्ये जवळपास 30 जणांचा मृत्यू झाला असून 50 जण जखमी झाले आहेत. लेडी रीडिंग रुग्णालयात 30 मृतदेह आणण्यात आल्याचे रुग्णालयातील अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. ही घटना कोचा रिसालदार परिसरात घडली आहे. पेशावरचे सीसीपीओ इजाज अहसान यांनी सांगितले की, स्फोटात एका पोलिसाचाही मृत्यू झाला आहे. लेडी रीडिंग रुग्णालयाचे मीडिया मॅनेजर असीम खान यांनी दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत 30 मृतदेह रुग्णालयात आणण्यात आले आहेत. पाकिस्तानात याआधीही असे अनेक हल्ले झाले आहेत. पुन्हा एकदा झालेल्या या स्फोटाने पाकिस्तान पुन्हा हादरून गेला आहे