Thursday, May 9, 2024

पार्थ पवारांसाठी शिवसेना मावळ मतदारसंघ सोडणार? खा.संजय राऊत यांचे मोठं वक्तव्य

शिवसेनेने मावळ मतदारसंघ राष्ट्रवादीला द्यावा, अशा आशयाची पोस्ट राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष नितीन देशमुख यांनी केली होती. यासंबंधी शिवसेना नेते संजय राऊत यांनी विचारलं असता त्यांनी अखेर यावर मौन सोडलं आहे. मावळ मतदारसंघाबाबत राष्ट्रवादी काँग्रेसने अद्याप अधिकृतपणे भूमिका मांडली नाही. त्यामुळे एखादा कार्यकर्ता भावनेच्या भरात बोलतो, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. संजय राऊत पुढे म्हणाले की, ‘पार्थ पवार हे तरुण कार्यकर्ते आहे. ते राजकारणात काम करत आहेत. पार्थ पवार यांच्या राजकीय भविष्याचा विचार त्यांचा पक्ष करेल. आमच्याकडे काही प्रस्ताव आला तर आम्ही त्यांच्या नेत्यांशी चर्चा करू’ असं राऊतांनी स्पष्ट केलं. त्यामुळे भविष्यात राष्ट्रवादी या मुद्द्यावर शिवसेनेशी चर्चा करणार का? हे पाहणं महत्त्वाचं आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles