‘प्रधानमंत्री ज्ञानवीर योजने’त बेरोजगारांना दरमहा ३४०० रूपये…. जाणून घ्या योजनेचे सत्य

0
568

एक मेसेज सध्या व्हायरल होत आहे. प्रधानमंत्री ज्ञानवीर योजने अंतर्गत तुम्हाला दर महिना ३४०० रुपये मिळतील असा दावा या मेसेजमध्ये करण्यात आला आहे. पण खरंच अशी काही योजना सरकारनं सुरु केली आहे का? खरंच बेरोजगार तरुणांना दर महिना केंद्र सरकारतर्फे पैसे मिळणार का? काय आहे या व्हायरल मेसेजचं सत्य.

“जे बरोजगार तरुण प्रधानमंत्री ज्ञानवीर योजनमध्ये नोंदणी करतील. त्यांना दर महिना ३४०० रुपये मिळतील.” असा दावा या मेसेजमध्ये करण्यात आला आहे. सोबतच नोंदणी करण्यासाठी एक लिंक देखीली देण्यात आली आहे. पण चुकूनही या लिंकवर क्लिक करू नका. कारण हा मेसेज खोटा आहे. अशा पद्धतीची कुठलीही योजना केंद्र सरकारनं सुरु केलेली नाही. या योजनेच्या नावाखाली तुमची आर्थिक फसवणूकही होऊ शकते. त्यामुळे ३४०० रुपये मिळण्याच्या आशेनं स्वत:ची वैयक्तिक माहिती कुठल्याही फेक वेब साईटवर देऊ नका.

FB IMG 1667637250734