व्हायरल होणारा व्हिडीओ हा डिजिटल नेटकरी या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर करण्यात आला होता. एका जोडप्याने आपल्या लग्नाआधी छान प्री – वेडिंग फोटोशूट केले होते, लग्नात येणाऱ्या पाहुण्यांसाठी एका मोठ्या स्क्रीनवर त्यांनी या शूटचे फोटो व व्हिडीओ दाखवलेले होते. या दरम्यान या दोघांचा किसिंग व्हिडीओ स्क्रीनवर सुरु झाला. अर्थात या जोडप्याची प्रतिक्रिया पाहता हा फोटो समोर दिसावा अशी त्यांची इच्छा नसणार असं वाटतंय. यानंतर एक एक करून असेच व्हिडीओ व फोटो समोर दिसू लागतात. यानंतर जोडप्याची मान शरमेने खाली गेली आहे.